breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी उलाढाल, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचा दर काय?

मुंबई : सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यामुळे कितीही महागाई असलं तरी सोने-चांदीची मागणी काही कमी झालेली नाही. तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आज सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उलाढाल झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर नक्की जाणून घ्या.

काय आहेत आजचे सोन्या- चांदीचे ताजे दर :

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६१,७१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६१,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. तर, बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,२३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,४५० रुपये प्रतिकिलो होती.

हेही वाचा  –  पैसाच पैसा..काँग्रेस खासदाराकडे सापडलं ३५१ कोटींचं घबाड! 

दरम्यान, वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

  • २४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.
  • २२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.
  • २१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.
  • १८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.
  • १४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button