ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पायाभूत सोयी-सुविधांमुळे डुडूळगाव ‘रेसिडेन्सिअल स्पॉट’

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे मत

यशदा ग्रुपचे वसंत काटे यांच्यातर्फे ‘गेट टुगेदर’ कार्यक्रम

पिंपरी । प्रतिनिधी
डुडूळगाव पायाभूत सुविधांनी विकसित झाले आहे. स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, उद्याने यासारख्या अनेक सोयी-सुविधांमुळे शहरात या गावाचा नावलौकीक वाढला आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

डुडूळगाव येथे प्रसिद्‍ध बांधकाम व्यावसायिक वसंत काटे यांच्या वतीने यशदा ग्रुप स्प्लेंडीड पार्क येथे “गेट टुगेदर” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमावेळी माजी महापौर नितीन काळजे, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

समाविष्ट गावांमधील डुडूळगाव येथील आजपर्यंतचा सर्वात मोठा सदनिका प्रकल्प म्ह्णून ‘यशदा ग्रुप स्प्लेंडीड पार्क’ या गृह प्रकल्पाकडे पाहिले जाते. नागरिकांनी या प्रकल्पाला पसंती दिल्याने या परिसराचा विकास होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून आमदार महेशदादा लांडगे आणि माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांनी केलेल्या विकास कामांमुळे या गावाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे मत व्यक्त करत विकसक वसंत काटे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या कार्याचे कौतुक केले.

नवनियुक्त पदाधिका-यांचा सन्मान…

प्रसंगी, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खेळ रंगला पैठणीचा या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देवून गौरविण्यात आले. तसेच, सोसायटीतील नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांचा सन्मान करण्यात आला. रहिवाशांनी आमदार महेश लांडगे आणि माजी महापौरांच्या स्वागताची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

आमदार लांडगे यांनी समस्या सोडवल्या : संजीवन सांगळे

शहरातील हजारो गृहप्रकल्पांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण २०१५ मध्ये फेडरेशनची स्थापना केली. फेडरेशनची स्थापना केल्यावर बलाढ्य असे बांधकाम व्यवसासायिक व सर्वसामान्य सदनिकाधारक यांच्यामध्ये अनेकवेळा संघर्ष निर्माण झाले. आशावेळी आमदार महेश लांडगे यांनी सतत सदनिकाधारकांची बाजू घेऊन सोसायट्यांना न्याय दिला. तसेच, सोसायट्यांचा अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्नाबाबत जातीने लक्ष घालून आंद्रा व भामा धरणांमधून २६८ एमएलडी पाणी मिळवण्यासाठी प्रकल्प हाती घेतले. तसेच, ओल्या कचऱ्याच्याबाबतही आमदार लांडगे यांनी सोसायट्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.त्यामुळे फेडरेशनच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो, असे मत फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button