Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

तुम्ही सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकलात, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शिवसेनेचा आज दसरा मेळावा सुरू असून शिंदे गट आणि ठाकरे गटातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होत असून शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होत आहे. यावेळी एकनाथ शिदेंनी जोरदार भाषण केलं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असला तरी तुमच्या मधलाच एक कार्यकर्ता आहे. हा जो काही विशाल असा समुदाय उसळलाय, तसेच आम्ही घेतलेली हिंदुत्वाची आणि बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्व रक्षणेच्या भूमिकेला संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अथांग जनसागर येथे उसळला असून खरी शिवसेना कुणाची आहे या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रासह अखंड हिंदुस्तानाला आज या महासागराने दिलेला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हजारो शिवसैनिकांनी आपला घाम आणि रक्त सांडून आपला पक्ष उभा केला. ते तुम्ही तुमच्या फायद्यासाठी आणि महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकलात. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकलात. त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हालाही नाचवू लागतात. बाळासाहेबांनी ज्या पक्षाचा उल्लेख हरामखोर असा केला होता. त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाल्या असतील. त्यामुळे आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी, हिंदुत्वासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही ही भूमिका घेतली आणि जाहीरपणे ही भूमिका घेतली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण आहेत, कुठे आहेत?, मला वाटतं असा प्रश्न यापुढे कोणालाही पडणार नाही. हे या आपल्या गर्दीने सिद्ध केलं आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी ठरवलं होतं की, हे मैदान देण्यासाठी यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो की, सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिला होता. मैदान सुद्धा आम्हाला मिळालं असतं. परंतु या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील माझी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मैदान जरी तुम्हाला मिळालं असलं तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार आमच्यासोबत आहेत. शिवसेना प्रमुखांची भूमिका आमच्यासोबत आहे. ही परंपरा मोडीत तुम्ही काढली. सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचारांना मुठमाती तुम्ही दिली. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. तुम्हाला त्या जागेवर उभा राहण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button