राज्यात पावसाचा पुन्हा यलो अलर्ट जारी, पुढील पाच दिवस पावसाचे
![Yellow alert issued again for rain in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/rain--780x470.jpg)
पुणे : काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यातच आता राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांसाठी राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुण्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद मगरपट्टा येथे २.५ मिलीमीटर झाली तर सर्वाधिक तापमान चिंचवडमध्ये ३६ अंश सेल्सिअस नोंदविला गेला आहे. राज्यातील विदर्भ आणि कोकणातील काही भागात पावसाची हजेरी जास्त असेल.
नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेची कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू परिसरासह दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.