जावळीत महिलांनी “शिवज्योत” आणून साजरी केली शिवजयंती
पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यांनी राबवला आगळा वेगळा उपक्रम

कुडाळ | जावली पंचायत समिती मधिल महिला अधिकारी व महिला कर्मचारी यांनी यावर्षी गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने किल्ले अंजिक्यतारा ते जावळी (मेढा ) पंचायत समिती अशी ” शिवज्योत” आणून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला.
पारंपारिक वेशभुषामध्ये सर्व सहभागी महिलांनी सकाळी ६ वा. किल्ले अजिंक्यतारा गडावर शिवगर्जना करत शिवज्योत प्रज्वलीत करून मेढ्याकडे मार्गक्रमण करण्यात आले. जावळी तालुक्याच्या हद्दीमध्ये शिवज्योतीचे आगमन होताच मोरावळे ते मेढा या मार्गावर स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केले. मेढा बाजारपेठे मधून वाद्यांच्या गजरात व फटाकड्यांच्या आतीषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात स्वागत कऱण्यात आले.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात केल्यास यश निश्चित; अविनाश भारती
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे व शिव ज्योतीचे पुजन गटविकास अधिकारी निलेश पाटील यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थतितीत करण्यात आले. या प्रसंगी प्रकल्प अधिकारी खामकर मॅडम,माजी जि.प. सदस्य दत्तात्रय पवार, सुरेश पार्टे, नारायण शिंगटे, प्रकाश कदम, वेण्णा विद्यालयाचे प्राचार्य पाटील (सर) व कार्यालयीन कर्मचारी उपस्थितीत होते.
मान्यवरांचे हस्ते शिवज्योत आणण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या रणरागीनींचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. पुष्पलता गायकवाड यांनी त्यांच्या सहकारी अधिकारी,कर्मचारी महिला हेमलता येवले, विजया भिलारे, अपर्णा जाधव, सविता सांगडे, शुभांगी कांबळे, अर्चना गंगावणे प्रतिमा कांबळे, कस्तुरी सुर्यवंशी, उषा उंबरकर,निर्मला नावडकर, वैशाली बामणे, देशमाने मॅडम यांच्यासह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकाऱ्यांने ” शिवज्योतीचे” उत्तम नियोजन केले होते. सातारा जिल्ह्यातील हा एकमेव आगळा वेगळा महिलांनी राबवलेला ” शिवज्योतीचा “‘ उपक्रम ठरला आहे. याप्रसंगी विशाल रेळेकर व कु. अन्वी नावडकर यांनी शिवगीतांचे सादरीकरण केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




