Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

पुढील आठवड्यातही पाऊस बरसणार, हवामान विभागाने काय अंदाज दिला?

Maharshtra Rain Update : मागील अनेक दिवसांपासून पावसाने थांबायचं काही नावंच घेतलं नसल्याचं पाहायला मिळालं. नवरात्र, दसरा अन् आता दिवाळीतही जोरदार पाऊस बरसत आहे. अशातच राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पुढील काही दिवस पावसाचे ढग कायम राहणार असल्याचा इशाराच हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवस पुण्यासह राज्यातील इतर भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 48 तासांसाठी मुंबईसह उपनगरांना वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलायं.

राज्यातील अनेक भागांत आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात काही भागांत आज पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रायगड, मध्य मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नांदेड या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा –  ‘गुरु तेग बहादुर यांचे हौतात्म्य भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या रक्षणासाठी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील अरबी समुद्रातसह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलायं. तसेच बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतरण होणार असून समुद्रातील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा देण्यात आलायं.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होईल. मंगळवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकेल. त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून 450 किमीवर आहे. त्याचे रूपांतर कदाचित तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button