Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यापालांच्या अभिभाषणात 2100 उल्लेख का नाही? लाडकी बहीण योजनेवरून विजय वडेट्टीवारांचा विधानसभेत सवाल

नागपूर : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यातून दिले होते. या माध्यमातून महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. मात्र राज्याच्या पहिल्याच अधिवेशनात राज्यपाल यांच्या अभिभाषनात लाडक्या बहिणी योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचा उल्लेख का नाही? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांना उपस्थित केला आहे.

राज्यपालांच्या अभिभाषनावरील चर्चेत वडेट्टीवारांनी राज्यात मोठ्या प्रमाणात तरुणी गायब होत असल्याचा उल्लेखही त्यांनी आहे.महागाई दर आणि महागलेल्या वस्तूंचा देखील वडेट्टीवार यांनी उल्लेख केला. महिलांच्या संरक्षणाच्या संदर्भात राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख झाला असता तर महिलांच्या प्रति सरकारने काही योजना केल्याचा आनंद घेता आला असता, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा      –        पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ अपघातात बिबट्याचा मृत्यू

महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची इकॉनोमी करणार असल्याचा उल्लेख राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणात केला. मात्र हा उल्लेख करत असताना या राज्यावर असलेले एकूण कर्जाचा उल्लेख आणि या राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती यावर देखील त्यांनी प्रकाश टाकण्याची आवश्यकता होती, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात जे सामोरे येत आहेत ते राज्य दिवाळखोरीत मार्गावर आहे का? असा प्रश्न पडतो, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button