स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असतं भाऊ? चर्चासत्राचे आयोजन
![Woman, What exactly is honor, ,Brother?, Seminar, Organized,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Women-Honor-780x470.png)
मुंबईः
महिला समान हक्क नि अधिकाराच्या पार्श्वभूमीवर महिलासक्षमीकरणाचे ढोल पिटले जातात, कायदे होतात,पण वास्तवात आपण अजूनही स्त्रीला माणूस म्हणून जगू देण्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचलोही नाही! क्षेत्र कोणतेही असो स्त्रीला दुय्यमच लेखल जाते. महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय, अपमानकारक, बीभत्स घटना याबाबत समाजमन संवेदनशीलता हरवून बसलं आहे की काय अशी भीती वाटू लागलीय! यासाठी स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असतं भाऊ? या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन मुंबई मराठी ग्रंसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृह, दादर येथे रविवार दिनांक 17 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वा. करण्यात आले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Untitled-8-723x1024.jpeg)
सदर चर्चासत्रामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज महिलांची प्रकट मते या चर्चेतून आपण जाणून घेता येणार आहेत. यामध्ये मा. राज्य महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण, मा. अध्यक्ष माविम, ज्योती ठाकरे, मा. वृषाली मगदूम, मा. संस्थापक, जिजाऊ वुमन लीगल फोरम, अॅड शुभांगी सारंग आणि सुसंवादक म्हणून मा. कार्याध्यक्षा व महिला समिती निमंत्रक, मुंबई मराठीग्रंथसंग्रहालय, पत्रकार शीतल करदेकर आदी सहभागी होणार आहेत.
बहुसंख्येने कार्यक्रमाला महिला अभ्यासक, कार्यकर्त्यां आणि सामाजिक भान जपणाऱ्या स्त्रीपुरुषांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह उमा नाबर यांनी केले आहे.