हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदूत्ववादी विचारांचे आम्हीही पाईक आहोत – खासदार प्रतापराव जाधव
मुंबई ः नागपूर येथील संघाच्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे ते त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते. आरएसएसच्या कार्यालयावर ताबा घेण्यासाठी नाही. संघाची विचारसरणी हिंदूत्ववादाची आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदूत्ववादी विचारांचे आम्हीही पाईक आहोत, असे स्पष्ट मत बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले आहे. संघ विचारांचा कीडा शिंदेच्या डोक्यात वळवळतोय. संजय राऊत यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ताबा मिळवला. राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना पक्षकार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद पटवत पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्यात आला. या कार्यालयाचं औपचारिक उद्घाटनही शिंदे गटाकडून करण्यात आलं. या कार्यालयाचं काहीच काळापूर्वी नुतनीकरण झालं होतं. बऱ्याच काळापासून हे कार्यालय बंद होतं. कोरोनानंतर हे कार्यालय उघडलेलं नव्हतं.
शिंदे गटाचा बाप जरी आला तरी शिवसेना भवनमध्ये घुसू शकत नाही. या संजय राऊत यांच्या विधानाचा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला.





