breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड शहरात उद्या पाणीकपात, शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

पिंपरी : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा – BCCI ची मोठी घोषणा! World Cup पूर्वी टीम इंडिया खेळणार ‘ही’ मालिका

महापालिकेमार्फत गुरूवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल, परंतु त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरूस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button