breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

BCCI ची मोठी घोषणा! World Cup पूर्वी टीम इंडिया खेळणार ‘ही’ मालिका

BCCI : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये झालेल्या पराभवानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.

या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही मालिका खेळणार आहे. येत्या १२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामन्याची मालिका आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, २ कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामन्याची मालिका आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका ही अमेरिकेत खेळवली जाणार आहे.

पाहा संपूर्ण शेड्यूल :
कसोटी सामने :

१२ – १६ जुलै – पहिला सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका
२० – २४ जुलै – दुसरा सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद

वनडे मालिका :

२७ जुलै – पहिला सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस
२९ जुलै – दुसरा सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस
१ ऑगस्ट – तिसरा सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

टी-ट्वेंटी मालिका :

३ ऑगस्ट – पहिला सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद
६ ऑगस्ट – दुसरा सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना
८ ऑगस्ट – तिसरा सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना
१२ ऑगस्ट – चौथा सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
१३ ऑगस्ट – पाचवा सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button