Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर पाणी, गुडघाभर पाण्यातून वाहनांचे मार्गक्रमण
![Water on Mumbai-Pune highway, vehicles plying through knee-deep water](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Mumbai-Pune-Expressway-780x470.jpg)
पुणे | पुणे-मुंबई महामार्गावर रविवारी दुपारी सुमारे पंधरा मिनिटांच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली ज्यामुळे सुमारे अर्धातास वाहतूक कोंडी झाली होती. अमृतांजन पॉइंट आणि बोर घाट बोगद्यादरम्यानच्या महामार्गावर गुडघाभर पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला होता. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुडघाभर पाण्यातून जाणाऱ्या वाहनांचा व्हिडिओ समोर आला आहे.
सखल भागात पाणी साचले असून त्यामुळे वाहनांना पाण्यातून जाणे अवघड झाले होते. जलमय रस्त्यावरून वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेला चिंचवली-बोरघर मार्ग सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेला असून, नदीला पूर आला आहे. यामुळे चिंचवली गाव खेड तालुक्यातील इतर गावांपासून पूर्णपणे तुटले आहे. खेड तालुका प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा – देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा शासन निर्णय जारी
https://x.com/PuneCityLife/status/
एक्सवर @PuneCityLife नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळील बोरघाटाजवळ ही सध्याची स्थिती आहे. गुडघाभर पाण्यातून वाहने मार्गक्रमण करत आहेत. गेल्या २४ तासांत लोणावळ्यात २४० मिमी पाऊस झाला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.