Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

स्फोटके-ज्वलनशील पदार्थ वाहनांना ‘नो-एन्ट्री’

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील गॅस टँकर अपघात आणि त्यानंतर झालेली ३२ तासांची कोंडी यामुळे वाहतूक व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वायुगळतीमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती अपघातानंतर होती.

येत्या काळात मिसिंग लिंकमुळे महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याचा दावा केला जाता आहे. मिसिंग लिंकवर कोणत्याही प्रकारची स्फोटके, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. वाहतुकीच्या नियमानुसार अशा वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश बंदीची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई–पुणे प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ९४ किमीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला. हा महामार्ग २००२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला असून या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी पथकर मोजावा लागतो. आजघडीला हा महामार्ग राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि वर्दळीचा महामार्ग आहे. या महामार्गावरून दररोज ७५ हजार वाहने धावतात.

मंगळवार सायंकाळी ५ वाजता झालेला गॅसटँकर अपघात आणि त्यानंतर झालेल्या ३२ तासांच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक-प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी मिसिंग लिंक प्रकल्पाची गरज अधोरेखित झाली आहे. मिसिंग लिंक प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाला असता तर ३२ तासांची वाहतूक कोंडी टळली असती अशी चर्चा सुरू आहे. मिसिंग लिंकमुळे महामार्गावरील घाटाचा प्रवास टळणार असून ६ किमीने प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.

हेही वाचा –  महाशिवरात्री दिवशी भीमाशंकर मंदिर बंद… ‘हे’ आहे कारण…

खोपोली – कुसगाव अशी १९.८० किमीची नवी मार्गिका एमएसआरडीसीकडून बांधली जात असून ही मार्गिका आता मिसिंग लिंक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. ६६९५ कोटी रुपये खर्चाची ही मार्गिका आतापर्यंत पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणाने कामाला विलंब झाल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे. मिसिंग लिंक वाहतूक सेवेत येण्याची प्रतीक्षा आहे. मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल झाली असती तर ३२ तासांची वाहतूक कोंडी टळली असती

राज्य सरकारनेही हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले आहे. त्यानुसार कामाला वेग दिला आहे. येत्या काही महिन्यांतच ही मार्गिका सेवेत दाखल केली जाणार आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास ३० मिनिटांची बचत होणार आहेच, पण त्याचबरोबर प्रवास सुरक्षितही होणार आहे. या मार्गिकेवरील १९ किमीच्या प्रवासात कोणतीही वायू गळतीसाठी घटना घडण्याची, वायू गळती वा स्फोटकांमुळे दुर्घटना घडण्याची भीती नाही. कारण या मार्गिकेवर स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.

अशा वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील घाट परिसरातूनच प्रवास करावा लागणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली. अशा प्रकारच्या रस्ते प्रकल्पातील वाहतूक नियमानुसार ही तरतूद आधीच करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटके, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारी वाहने वगळता इतर वाहनांना मिसिंग लिंकसह घाट परिसरातूनही प्रवास करता येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button