breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज, पोलिस हाय अलर्टवर

मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला ६ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा एक धमकीचा मेसेज  आला आणि एकच खळबळ उडाली. हा मेसेज मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने हेल्पलाइन क्रमांकाच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक मेसेज पाठवला. मुंबईत ६ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीही त्याने दिली. या मेसेजनंतर मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आणि मेसेज पाठवणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.

हेही वाचा  – ‘२०४७ पर्यंत विकसित भारताचा आराखडा दर्शवणार अर्थसंकल्प’; अमित शाह

तसेच वाहतूक पोलिसांनी शहर पोलिस आणि गुन्हे शाखा एटीएसलाही माहिती दिली. काही संशयास्पद ठिकाणांचीही झडती घेण्यात आली मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. यानंतर रात्री उशिरा जॉइंट सीपींनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. शहर पोलिसांसह गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत आहे.

यापूर्वीही वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल आणि मेसेजद्वारे धमक्या आल्या आहेत. मात्र त्यामध्ये काहीच तथ्य आढळले नव्हते. आता पुन्हा असाच मेसेज आल्याने खळबळ माजली. धमकीचा तो मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button