मुकेश अंबानींना जीवे मारण्याची तिसरी धमकी, ४०० कोटींच्या खंडणीची मागणी!
मुंबई : भारतीय बिझनेस टायकून आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने अंबानींकडे ४०० कोटी रूपयांची मागणी केली आहे. या पुर्वीही त्यांना सलग दोनदा अशाच धमक्या आल्या आहेत.
२७ ऑक्टोंबर रोजी पहिली खंडणी २० कोटी रूपयांची मागणी केली होती, तर दुसरी २०० कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान, सोमवारी ३० ऑक्टोंबर रोजी त्यांना पुन्हा एक मेल आला. यामध्ये ४०० कोटी रूपये मागितले आहेत. एकाच मेलवरून तीन्हीही धमक्या आल्या आहेत.
हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू, शिंदे गटातील आणखी एका खासदाराचा राजीनामा
Reliance Industries Chairman Mukesh Ambani has received three death threats in three days from the same email. The sender has demanded Rs 400 crores from Ambani now due to non-response to the previous emails. A case has been registered against an unknown person in Gamdevi PS of…
— ANI (@ANI) October 31, 2023
पोलीस तपासात हा मेल आयडी शादाब खान नावाच्या व्यक्तीचा असून हा मेल बेल्जियममधून आल्याचे समोर आले आहे. हा त्या व्यक्तीचा बरोबर आयडी आहे का किंवा हे मेल फेक आयडीवरून पाठवले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.