लाडक्या बहीण योजनेचा पुढील हप्ता जमा होण्यापूर्वी ‘या’ कागदपत्रांची तपासणी होणार
![These documents will be checked before the next installment of Ladkya Bhaeen Yojana is deposited.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Ladki-Bahin-Yojana-1-780x470.jpg)
Ladki Bahin Yojana | महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू केली आहार. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेच्या पैशांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे महिलांना २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान महिलांना डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. मात्र ती कागदपत्र कोणती ते आपण पाहुयात…
‘या’ कागदपत्रांची तपासणी होणार :
उत्पन्नाचा दाखला : लाडक्या बहीण योजनेच्या अर्जदार महिलांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे, मात्र त्याची मर्यादा वार्षिक २.५ लाख रुपये असणे आवश्यक आहे.
हेही वाचा – रिंग रोडच्या भूसंपादनासाठी एमएसआरडीसीकडे ५०० कोटींची मागणी
आयकर प्रमाणपत्र : लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल. तसेच लाभार्थी महिला IT रिटर्न भरत असल्यास अपात्र ठरणार आहे.
सेवानिवृत्ती पेन्शन व वाहन मालकी : निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांची आता तपासणी केली जाणार आहे. मात्र यामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
क्षेत्र : पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. तसेच प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच हा लाभ दिला जाणार आहे.