ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: यशवंतनगरातील ड्रेनेज तुंबल्याची समस्या तातडीने निकाली

मा. महापौर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांच्या पुढाकाराने जेटिंग मशीनद्वारे मुख्य ड्रेनेज लाइनची सखोल साफसफाई; नागरिकांना दिलासा

पिंपरी- चिंचवड : यशवंतनगर परिसरातील मुख्य ड्रेनेज लाइन तुंबल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत महापौर तथा प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांच्या पुढाकाराने तातडीने जेटिंग मशीनच्या सहाय्याने साफसफाईची कार्यवाही करण्यात आली.

ड्रेनेज लाइनमध्ये साचलेला गाळ, कचरा व इतर अडथळे काढून संपूर्ण लाइनची सखोल स्वच्छता करण्यात आली. या कार्यवाहीमुळे सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून दुर्गंधी, अस्वच्छता तसेच पाणी साचण्याच्या समस्येतून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा –  गणेशोत्सव : किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होताच संबंधित विभागाशी समन्वय साधून ही कार्यवाही करण्यात आली. प्रभागातील ड्रेनेज, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तत्परतेने उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत असल्याचे डॉ. घोडेकर-लोंढे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“नागरिकांच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडविणे ही आमची जबाबदारी आहे. यशवंतनगरातील ड्रेनेज तुंबल्याची तक्रार मिळताच तातडीने जेटिंग मशीनद्वारे साफसफाई करण्यात आली. प्रभागातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त परिसर मिळावा, यासाठी सातत्याने कार्यरत राहू.”

— डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, मा. महापौर तथा नगरसेविका, प्रभाग क्रमांक ९ .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group