TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘जरांगे पाटील सरकारच्या गळ्यातील फास झाले आहेत; ‘आता त्यांना मारायचे आहे’ : संजय राऊत

“सरकारने जरांगेंच्या आंदोलनाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला; आता वाऱ्यावर सोडले”; उपोषणाच्या १२व्या दिवशी प्रकृती खालावल्यावर राऊतांचा सरकारवर निशाणा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचे आहे. मनोज जरांगे हे सरकारच्या गळ्यातील फास झाले आहेत,” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

‘जरांगेंचा संघर्ष सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास’

मनोज जरांगे पाटील यांची लढाई आणि त्यांचा संघर्ष हा आता सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास बनला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. “मनोज जरांगे पाटील यांचा उपयोग सरकारसाठीचा संपला आहे. सरकारने त्यांच्या उपोषणाचा आणि लढ्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतला आणि आता जरांगेंना वाऱ्यावर सोडले आहे,” असे राऊत म्हणाले.

उपोषणाच्या १२व्या दिवशी प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १२वा दिवस असून, गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती गंभीररीत्या खालावली होती. त्यावेळी मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी सलाईन लावून घेण्यास होकार दिला होता.

गेल्या ११ दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण न गेल्यामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. त्यांच्या शरीरातील शुगरची पातळीही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा –  पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

‘जरांगेंना समजावण्यापलीकडे सरकारकडे पर्याय नाही’

एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यावर ठाम आहेत. मात्र, राज्य सरकार आता जरांगेंची समजूत काढण्यासाठी आणखी प्रयत्न करेल, असे दिसत नसल्याचे संकेत मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यापूर्वी दिले आहेत.

“मनोज जरांगे आंदोलनावर ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. शासनाकडून जे निर्णय घेणे आवश्यक होते, ते आपण केले आहेत. त्यात त्यांचे समाधान होत नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यापलीकडे त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही सोडवत आहोत. शेवटी मराठा समाजाच्या व्यापक हितासाठी आम्ही निर्णय घेत आहोत आणि त्या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू आहे,” असे विखे-पाटील यांनी म्हटले होते.

“त्यात जरांगे पाटील समाधानी नाहीत. त्यामुळे आता माझ्याकडे असा काही पर्याय नाही, ज्यामुळे मी त्यांचे समाधान करू शकेन,” असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकार आणि मराठा आंदोलन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group