breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रसातारा

भुईंज पोलीसांच्याकडून २२ लाख रूपयांची चोरी उघड, आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलीसांची कारवाई

सातारा : २६ सप्टेंबर रोजी हॉटेल कोहिनूर येथे लक्झरी बसमधून चोरट्याने रू.२२ लाख रोख रक्कम असलेली बॅग घेवून पोबारा केला होता. यातील असलेला आरोपी मध्यप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडून रू. २२ लाख पैकी १८ लाख रूपये रोख रक्कम जप्त करण्यात भुईंज पोलीसांना व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

याबाबततची अधिक माहिती अशी की फिर्यादी नरेंद्र प्रल्हादसिंग गिरासे वय ४२ रा . विश्रांतवाडी पुणे हे सुवर्णा वील्डकॉन कंपनी पुणे येथे कामास असून या कंपनीचे डंपर, टँकर, मिक्सर, पोकलॅण्ड अदी स्कॉप मटेरिअल बंगलोर बाजूकडे विकलेले होते. त्यातील रोख रक्कम घेवून ते बंगलोर येथील टुमकुर येथून व्हि. आर. ट्रॅव्हल्सच्या KA 25 D 4863 या व्हॉलव्को वसने पुणे वाजूकडे निघाले होते. २६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते ८.१५ च्या दरम्यान ही बस नाष्ट्यासाठी वोपेगाव ता बाई हद्दीतील एका हॉटेलमध्ये थावली यावेळी फियार्दीने नरेंद्र गिरासे हे रोख रक्कम असलेली बॅग गाडीत ठेवूनच नाष्टा करण्यासाठी खाली उतरले होते. त्या दरम्यान अज्ञाताने ती रोख रक्कम असलेली बॅग घेवून पसार झाला होता.

हेही वाचा – रस्त्यावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे मिळणार कर्ज!

सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाळासाहेब भालचिम व सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मर्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांनी त्यांचेकडील एक टीम व स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम करून तपासाची सुत्रे हाती घेतली आणि तांत्रिक यंत्रणेच्या आधारे या टीमने आपल्या कार्यकुशलतेवर आरोपीची नाव व पत्ता मिळवण्यात या टीमला यश मिळाले. तात्काळ सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने मध्यप्रदेश येथे जावून रज्जब हसन खान वय ४१ रा. सिंधी मोहल्ला धरमपुरी जि धार राज्य मध्यप्रदेश येथून त्याला ताब्यात घेवून त्यास भुईंज पोलीस स्टेशनमध्ये आणून चोरीच्या गुन्हयात अटक करून मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली. पोलीस कोठडी रिमांडच्या मुदतीत आरोपीकडे सखोल तपास करून चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी १८ लाख रूपये जप्त करण्यात या टीमला यश आले.
या टीम मध्ये भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, शरद वेवले प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निवाळकर यांनी या कारवाई सहभाग घेतला होता.

रमेश गर्जे यांच्या कामगिरीला सलाम

गुन्हेगार गुन्हा करून गेले तब्बल २२ लाख रूपयावर गुन्हेगाराने डल्ला मारला मात्र गुन्हा करताना गुन्हेगारांने पुर्णपणे सावधगिरी बाळगत कोणती चूक कोणताहि पुरावा राहणार नाही याची तंतोतंत काळजी घेतली होती.सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांनी रात्रीचा दिवस करीत तपासकामी व्यस्त होते. अखेर तांत्रिक तपासातून रमेश गर्जे व त्यांच्या मास्टर ब्लास्टर टीमला यश आले. या टीमने मध्यप्रदेशमधून खडतर प्रयत्नातून एखादया सिनेस्टायल प्रमाणे जीवावर उधार होवून आरोपी तर पकडलाच पण चोरीस गेलेली रोख रक्कम सुद्धा मिळण्यात आली. खरच या टीमची कामगिरी कौतुकास्पद असून सपोनि रमेश गर्जे व या टीमवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button