शिंदे गटाचा गेम झालाय, म्हणून नजर मिळवत नाही; आदित्य ठाकरेंचा टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Aditya-Thakre.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
‘शिंदे गटाचा गेम झालाय, म्हणून नजर मिळवत नाही’, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांची अलिबागमध्ये शिवसंवाद यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. “मला दु:ख सरकारमधून बाहेर पडल्याचे नाही. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी आपण मेहनत घेतली, ज्यांना आपल राष्ट्रीय जन्म दिला, दिवसरात्र मेहनत घेऊन प्रचार केला, निवडून आणले. निवडणून आणल्यानंतर सराकर जपायचे असते. सरकारमध्ये असताना मंत्रिपद यांना पाहिजे असते. त्यांच्या स्वार्थासाठी आपण सगळे करत गेलो. आपण पाहिले हे नेते गोव्यात गेले तेव्हा त्या हॉटेलमध्ये टेबलवर नाचत होते”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.हे निर्लज आणि गद्दार तुमचे नेते होऊ शकतात का? तुमचे आमदार होऊ शकतात का? तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात का? असे सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
मागील अनेक दिवसांपासून राज्यभरात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा करत आहेत. या यात्रेत ते शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा अलिबागमध्ये काढण्यात आली असून, अलिबागमध्ये आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांवर टीका केली.