ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘पीएमआरडीए’च्या 407 पदांचा आकृतीबंध मंजूर

सरळसेवा पदभरतीचा मार्ग मोकळा!

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) 407 पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्यामुळे सरळसेवा आणि प्रतिनियुक्तीने पदभरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पीएमआरडीएमध्ये सध्या आस्थापनेवर, पद्धतीने, करार प्रतिनियुक्तीवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे 24 निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना ठराविक कालावधीसाठी नियुक्ती दिलेली आहे. राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या पीएमआरडीए आकृतीबंधात गट अ साठी 82, गट ब साठी 110, गट क 165 आणि गट ड 50 अशा पदांना मंजुरी मिळाली आहे.

आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर आता याबाबतचे सेवा प्रवेश बनणार आहे. हे सेवा प्रवेश तयार झाल्यानंतर ते राज्य सरकारला सादर करण्यात येतील. त्यानंतर, पीएमआरडीएला सरळसेवा आणि प्रतिनियुक्तीने आवश्यक पदे भरता येणार आहेत. पीएमआरडीएमध्ये सध्या प्रतिनियुक्तीवर गट अ – 35, गट ब – 21 आणि गट क – 16 जागांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button