ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसातारा

चोरीचा बनाव पोलिसांनी अवघ्या ४ तासात केला उघड!

गाडीची काच फोडून पैसे लंपास; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

भुईंज: टेंपोची काच फोडुन १ लाख ४ हजार ५७५ रु रोख रक्कम असलेली बॅग चोरीस गेल्या बाबतची तक्रार भुईंज पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. ३० रोजी ९ वा. सुमारास फिर्यादि हे मेडिकल औषधाच्या बॉक्स ची विक्री करुन मिळालेले १,०४,५७५/- रुपये घेऊन जात असताना काही कारणास्तव ते गाडी थांबवून बाजूला गेले असता पुन्हा परत आल्यावर त्यांचा गाडीची काच फोडून पैसे लंपास केले असल्याचे त्यांना दिसून आले.

सदरचा गुन्हा उघड करणेबाबत बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी सुचना दिल्या होत्या. स.पो.नि. रमेश गर्जे यांनी स्टाफ सह घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली असता फिर्यादी व त्याचे साथीदार यांचेकडे सदर घटले प्रकाराबाबत सखोल चौकशी केली असता त्यांच्या चौकशीत काही संशयास्पद गोष्टी आढळुन आल्या.

म्हणुन त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता फिर्यादीसोबत असलेले त्यांचे साथीदार राहुल गोळे, मयुर किर्दत त्यांनी त्यांचे सातारा येथील ओमकार गोळे, अभिजित गोळे यांनी संगणमत करुन गुन्हयाचा कट रचुन फिर्यादीला शेतामध्ये पुढे पाठवुन पाठीमागे सदर पैशाची बॅग त्यांचे साथीदारांकडे देवुन, गाडीची काच फोडुन चोरीचा बनाव केल्याचे सांगीतले. चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची न्यायालयाकडुन २ दिवस पोलीस कोठडी घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली १ लाख ४ हजार ५७५ रु रोख रक्कम असलेली बॅग हस्तगत करण्यात आली.

बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि रमेश गर्जे, पोउनि विशाल भंडारे, स.फौ.विजय अवघडे, स. फौ. राजे, पो.हवा. नितीन जाधव, पो.हवा. राजाराम माने, सुहास कांबळे, पोना सुशांत धुमाळ, पो कॉ रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button