breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 22,38,398 वर

  • मुंबईत 1,012, पुण्यात 2,112 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याशिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात 9,927 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 12,182 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आणि 56 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 22,38,398 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 52,556 इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत 20,89,294 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर सध्या 95,322 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 1,012 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 1,051 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,35,584 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,506 इतका झाला आहे, तर 3,12,458 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या 10,736 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी 2,112 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यंदाच्या वर्षातील हा दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांचा सर्वाधिक आकडा असून यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,22,989 वर पोहोचली आहे. तर काल 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आणि 1,722 जण कोरोनामुक्त झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 9,330 वर पोहोचला असून 3,99,310 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, काल आढळलेल्या 2,112 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1,086, पिंपरी-चिंचवडमधील 635, पुणे ग्रामीण भागातील 265 आणि कंटेन्मेंट झोनमधील 126 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button