पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक देण्यात येणार, केंद्रीय पुरातत्व विभागाची योजना
![The historic Shaniwar Wada in Pune will be adopted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Shaniwar-Wada-780x470.jpg)
पुणे | पुण्याची ऐतिहासिक ओळख असणारा शनिवार वाडा दत्तक दिला जाणार आहे. केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार वाड्यासोबतच आगाखाना पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी ही वारसा स्थळे दत्तक देण्यात येणार आहेत. दरम्यान, या निर्णयाला पुण्यातील ब्राम्हण महसंघाने विरोध केला आहे.
ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी केंद्रीय पुरातत्व खात्याने नवी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक दिली जाणार आहेत. पुरातत्व स्थळांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने केंद्रीय पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतलाय. या विभागाअंतर्गत अॅडॉप्ट अ हेरिटेज योजनेखाली सध्या संपूर्ण संस्थान दत्तक घेता येणार आहेत. या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धन केले जाणार आहे.
हेही वाचा – ‘अशा ठिकाणी पाठवू की बायकोला फोनही लागणार नाही’; नितेश राणेंची पोलिसांना धमकी
दरम्यान, केंद्राच्या या निर्णयाला ब्राम्हण महासंघाने विरोध केला आहे. दत्तक घेतलं जातं त्याला कोणी पुढे मागे सांभाळणार नसतं अशी टीका ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना खुश करण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने घेतला आहे.वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत काय सुरू आहे? केंद्र सरकारच्या सुरु असलेल्या हिरवीकरणाला आमचा विरोध असल्याचे आनंद दवे म्हणाले.