Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहावी परीक्षेबद्दल बोर्डाचा अत्यंत मोठा निर्णय, थेट दहावीची परीक्षा आता वर्षातून…

10th exam : राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रशासनाकडून मार्गदर्शन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10 वीची परीक्षा आजपासून सुरू झाली. 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत परीक्षा सुरू असेल. आज विद्यार्थ्यांचा पहिला पेपर आहे. राज्यातील एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली. अनेक भरारी पथके तयार करण्यात आली असून कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाचा भर आहे. काही केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. अगोदरच शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले की, कॉपी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. आता दहावीच्या परीक्षेबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे.

Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक अत्यंत मोठा निर्णय नक्कीच म्हणावा लागेल. दहावीची पहिली परीक्षा सक्तीची न दिल्यास दुसरी संधी मिळणार नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही.

हेही वाचा –  4 सामन्यांत 4 विजय, तरीही ड्रेसिंग रूममध्ये तणाव; धक्कादायक रेकॉर्ड समोर

किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल. नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच थोडक्यात काय तर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची पळ वाट शोधता येणार नाही.

सीबीएसईकडून वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाणार ही वस्तूस्थिती असली तरीही पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. हा मोठा निर्णय बोर्डाने घेतला आहे. एसेंशियल रिपीट श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. बोर्डाने यावर आता भूमिका स्पष्ट केली आहे. वर्षातून दोनदा दहावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने नक्कीच घेतला आहे. मात्र, नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल हे स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button