शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा १४ वा हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला येणार..
![The 14th installment of PM Kisan Yojana will be paid on July 27](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/pm-kisan-yojana-780x470.jpg)
PM Kisan Yojana : महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना १८६६.४० कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २७ जुलैला वितरित करण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जाणार आहे. विविध माध्यमातून केंद्र सरकारने ही माहीती दिली आहे.
केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना लाभ पोहोचवणाऱ्या या योजनेअंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १.२५ लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे देशाला समर्पित केली जाणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत १४ व्या हप्त्याची रक्कम देशातील ८.५ कोटी हून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जवळपास १७,००० कोटी रुपये थेट हस्तांतरीत केले जाणार आहेत.
हेही वाचा – ‘राहुल गांधींनी मणिपूर पेटवण्याचं काम केलं’; स्मृती इराणींचा गंभीर आरोप
दरम्यान राज्यात बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर राज्य सरकारकडून कारवाई सुरू आहे. खतांच्या लिंकिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना नोटीस पाठवलेल्या आहेत. राज्यात कुठेही खतांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी राज्यस्तरावर डॅशबोर्ड विकसित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी दिली आहे.
कृषिमंत्री म्हणाले की, बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई, खते आणि बियाणांचा दुकानातील उपलब्ध साठा याची माहिती शेतकऱ्यांना डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळेल. राज्यात गुणवत्तापूर्ण खत मिळण्यासाठी १ हजार १३१ खत निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्य तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात येते. राज्य, विभाग व जिल्हास्तरावर ३९५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे, अशीही त्यांनी माहीती दिली.