TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

चिंचवड विधानसभा मतदार संघातील ५ लाख ७९ हजार मतदारांपैकी ३ लाख ६५ हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी निलेश देशमुख यांचे आवाहन

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदार संघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात येणाऱ्या अर्जाची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतदान केंद्र स्तरावरील अधिकारी ‘हाऊस टू हाऊस’ सर्वेक्षण करत आहेत. 5 लाख 79 हजार मतदारांपैकी आत्तापर्यंत 3 लाख 65 हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये स्थलांतरित, ज्या मतदारांचे फोटो ब्लॅक अँड व्हाईट किंवा अस्पष्ट आहेत, अशा मतदारांचे नवीन कलर फोटो अपलोड करण्यात येत आहेत. नागरिकांनी स्थलांतरित, मयत झालेल्या मतदारांची माहिती बीएलओंना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अमोल कदम यांनी केले आहे.

पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत 1 जून 2023 ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानंकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा, विभाग अथवा भाग यांची आवश्यकतेनुसार सुधारणा व मतदान केंद्रांच्या सीमांच्या पुर्नरचना करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक..
21 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 – मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, तसेच अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, आणि तुलनात्मक फरक शोधुन फरक दुर करण्यासाठी, कालबध्द योजना आखणे,
कंट्रोल टेबल अपडेट करणे
30 सप्टेंबर ते 16ऑक्टोबर- नमुना 1 ते 8 तयार करणे, 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे

17ऑक्टोबर – एकत्रित प्रारूप यादी तयार करणे
17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर – दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी
दोन शनिवार व रविवार

26 डिसेंबर – दावे व हरकती निकालात काढणे
1 जानेवारी 2024 – अंतिम यादी प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटा बेस अपडेट करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे
5 जानेवारी 2024- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे

मतदान केंद्रांची होणार पुनर्रचना..
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार एका केंद्रावर 1500 पर्यंत मतदारांची यादी असणे बंधनकारक आहे. चिंचवडमध्ये 510 मतदान केंद्र आहेत. तसेच काही मतदान केंद्र ही पहिल्या मजल्यावर आहेत. हे केंद्र तळ मजल्यावर घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यांना मतदान पूर्निरीक्षणच्या निमित्ताने आवश्यक ती माहिती देण्यात आली आहे.

तिन्ही मतदार संघात 10 लाख मतदारांना पाठविले ‘एसएमएस’
चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करणे, नावामध्ये दुरुस्ती करणे आणि आधार कार्ड लिंकींग करणे यासाठी तब्बल 10 लाख एसएमएस पाठविण्यात आले आहेत. तसेच त्यांना आयव्हीआरएस काॅलिंगही करण्यात येत आहे. नागरिकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाइनचा वापर करून मतदान यादी शुध्दीकरण, अद्ययावतीकरणाचे जे काम आहे त्यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मतदार संघ आहे. मात्र, या मतदार संघात युध्द पातळीवर मतदार सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत 5 लाख 79 हजार मतदारांपैकी 3 लाख 65 हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण अजून चालू आहे. तसेच मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
– नीलेश देशमुख
मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button