पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पाणी आल्याने बंद, ८ जणांना वाचवले
![Sudden rise in water level of Krishna river; Danger of flood to Sangli](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/n-4-e1627006524521-780x470-1.jpg)
निपाणी – गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर (NH4) सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आहे.
दरम्यान मध्यरात्री कोल्हापूर येथून बेळगावकडे जाणारी कार व ट्रक पाण्यातच अडकून पडले.यावेळी रस्ते देखभाल जयहिंद कंपनीसह पोलिस प्रशासनाने मोठ्या शर्यतीच्या प्रयत्नाने कारमधील ५ व ट्रक मधील ३ अशा ८ जणांना सुखरूप बाहेर काढले. असून दोन्ही वाहने पाण्याचा अडकून पडले आहेत.
दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने तहसील व पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली आहे.त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिले आहेत.गुरुवारी मध्यरात्री पाच फुटाने वाहणारे पाणी शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास पाणी पातळीत वाढ होऊन १० फूटाने पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत होते.त्यामुळे २०१९ सालाची पुन्हा पुनरावृत्ती झाली असून राष्ट्रीय महामार्ग गेल्या पाच वर्षात तिसऱ्यांदा बंद झाला आहे.घटनास्थळी तहसील, पोलिस प्रशासन, तळ ठोकून आहे.दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून तहसील प्रशासनाने चिकोडी येथे राखीव असलेल्या एनडीआरएफ तुकडीला पाचारण केले.सकाळी दहानंतर प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवा तसेच रुग्णांना सेवा दिली जाणार आहे.
गुरुवारीच पावसाचा जोर असाच राहिल्यास उद्या शुक्रवार पर्यंत होणार महामार्ग बंद असा अंदाज व्यक्त केला होता. अखेर पुढारीच हा अंदाज खरा ठरला आहे.दरम्यान सौंदलगा व यमगरणी वेदगंगा नदी पुलावर दोन्ही बाजूला स्थानिक ग्रामपंचायतीच्या तहसील पोलिस तसेच जिल्हा पातळीवरील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तळ ठोकून आहेत.दोन्ही बाजूला पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स व आदी साहित्य लावून नागरिकास वाहनांना प्रवेश बंद केला आहे.एनडीआरएफ पथक येऊन पाहणी केल्याशिवाय कोणत्याही नागरिकांना व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
दोनच दिवसात महामार्ग पाणी…
गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसामुळे 2019 साला ची पुनरावृत्ती होऊन पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी होऊन महामार्ग बंद पडला आहे.दोन दिवसात परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.सध्या ही मुसळधार पाऊस सुरू आहे.निपाणी तालुक्यातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून अनेक गावांना महापुराने वेढा दिला आहे.त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच तहसील व पोलीस प्रशासन अडकून पडलेल्या नागरिकांच्या स्थलांतरासाठी कामाला लागले आहे.