ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘आम्ही भोसरीकर’ आयोजित संयुक्त ढोल वादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तब्बल २१० ढोल, ६० ताशे तर ३१ ध्वजांचा समावेश

पिंपरी । प्रतिनिधी

पथकांचा सराव आणि ढोल-ताशांचा निनाद ठरलेलाच….हाच ठेक्यांचा निनाद भोसरी येथे ऐकायला मिळत आहे…कारण ढोल-ताशाच्या पथकांच्या सरावाला दणक्यात सुरुवात झाली आहे. तरुणांचा सळसळता उत्साह आणि जोश सरावातही पाहायला मिळत आहे, प्रत्येकजण नव्या आत्मविश्वासाने वादन करताना पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही भोसरीकर आयोजित संयुक्तपणे ढोल-ताशा वादन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. रविवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजता अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २१० ढोल, ६० ताशे तर ३१ ध्वजांचा समावेश होता.

बाप्पांच्या आगमनास काहीच दिवस उरलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथके सक्रीय झाली असून ढोल ताशा पथकांच्या तालमी ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. बाप्पाचे आगमण व विसर्जनासाठी पथकांकडून बुकींगला चांगला प्रतिसाद मिळत असून काही पथकांचे बुकींग फुल्ल झाले आहे. ढोल-ताशा पथकांच्या सरावाला दणक्यात सुरुवात झाली आहे. तरुणांचा सळसळता उत्साह आणि जोश सरावातही पाहायला मिळत आहे, प्रत्येकजण नव्या आत्मविश्वासाने वादन करताना पाहायला मिळत आहे. उपनगरांत २० दिवसाआधीच पोलिसांची परवानगी नसतानाही सराव सुरु झाला खरा पण पोलिसांच्या परवानगीनंतर बुधवारी अधिकृतपणे पथकांनी सराव सुरु केला आहे.पहिल्याच दिवशी वादनाचा सराव तरुण-तरुणींनी मोठ्या जल्लोषात केल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – ‘नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायलाच..’; लालूप्रसाद यादव यांचं वादग्रस्त विधान 

गणेशोत्सवाच्या एक महिना आधी ढोल-ताशा पथकांतील तरुणाईच्या सरावाला सुरुवात होते. यंदा वादनाचा या निनादाला उत्साहात सुरुवात झाली आहे. ढोल वादनात व्यग्र असलेल्या तरुणी, वरिष्ठांकडून ताशा वादनाचे बारकावे समजून घेताना तरुण, नावनोंदणी करणारे पथकातील समन्वयक….असे चित्र पहिल्या दिवशी पथकांच्या सरावाच्या ठिकाणी पाहायला मिळाले. यामध्ये वीर वाद्यपथक भोसरी, गुरुनाद पारंपरिक ढोल ताशा व ध्वज पथक, भोसरी, शिवराज वाद्य पथक दिघी, जगदंब मावळ्यांच्या इतिहासाचे साक्षिदार, निनाद, पारंपरिक ढोल ताशा व ढोल पथक, शिवनीती वाद्यपथक भोसरी, स्वराज्य वाद्य पथक भोसरी आदी ढोलताशा पथकांनी सहभाग नोंदविला.

जगदंब ढोल ताशा पथक, वीर, गुरुनाद, शिवनीति, निनाद, शिवराज, स्वराज्य ढोल ताशा पथक या सर्व पथकांनी एकत्र वादन करून आम्ही भोसरीकर एकत्र आहे हे दाखवून दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button