breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

पंढरपूर – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिक सेवेला पैशाने हरवलं, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी काल पार पडली. समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला.

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना एकूण 1 लाख 09 हजार 450 मत मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 05 हजार 717 मत मिळाली. अवघ्या 3733 मतांनी समाधान आवताडे विजयी झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button