Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘वीज ग्राहकांच्या उपस्थितीतच स्मार्ट मीटर बसविले जातील’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नागपूर : राज्यात महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरु असून त्यांच्या उपस्थितीतच हे मीटर लावले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत दिली.

शीळ, मुंब्रा, कळवा आदी परिसरात टोरंट कंपनीकडून सक्तीने वीजबिल वसुली सुरु आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असूनही त्यांच्याकडून वसुली सुरु आहे, आदी मुद्दे राजेश मोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) भास्कर जाधव यांनी स्मार्ट मीटर सक्तीचा मुद्दा उपस्थित केला. कोकणातील अनेक चाकरमानी बराच काळ मुंबईत असतात व त्यांची घरे बंद असतात. पण त्यांच्या घराची कुलुपे तोडून महावितरणकडून जुनी मीटर काढून स्मार्ट मीटर बसविली जात असल्याची तक्रार जाधव यांनी केली.

घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविली जाणार नाहीत, असे आश्वासन फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते, तरीही स्मार्ट मीटर सक्तीने व ग्राहकांच्या घरात घुसून त्यांच्या अनुपस्थितीत लावली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यावर ग्राहकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसविणे चुकीचे असून तसे न करण्याचे आणि ग्राहकांच्या उपस्थितीतच स्मार्ट मीटर बसविण्याचे आदेश दिले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  भारत – दक्षिण आफ्रिका तिसरा टी -२० सामना केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?

केंद्र सरकारने आरडीएसएस योजनेअंतर्गत महावितरण कंपनीला २९ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असून त्यासाठी सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याची अट घातली आहे. सुरुवातीला स्मार्ट मीटर बसविण्याची अट होती, पण आपण आता पाच कंपन्यांकडून स्मार्ट मीटर बसवीत आहोत. ही मीटर लावलेले ९९ टक्के ग्राहक समाधानी असून एक टक्का ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी २४ तास मदतकेंद्र उपलब्ध आहे.

सुरुवातीला फीडर, शासकीय कार्यालये व इतरांना स्मार्ट मीटर बसविण्यात आली असून आता घरगुती ग्राहकांसाठी ती बसविली जात आहेत. स्मार्ट मीटर बसविणाऱ्या ग्राहकांची वीजबिले पूर्वीपेक्षा वाढलेली नाहीत, उलट १० टक्के सवलत देण्यात आली असून ती पाच वर्षे लागू राहील. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविणाऱ्या वीजग्राहकांचा फायदा आहे. या ग्राहकांसाठी अॅप असून त्यावर प्रत्येक तासाला किती वीज वापरली गेली, याची माहिती मिळते, असे फडणवीस यांनी स्पष्ट

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button