Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भारतीय संघाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यापुर्वी महत्वाचा खेळाडू बाहेर

बीसीसीआई अध्यक्ष जय शहा यांनी दिली माहिती

मुंबई : श्रीलंकेविरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये भारतीय संघाने क्लीन स्वीप केलं. भारतीय संघाची पुढची सिरीज न्यूझीलंड विरूद्ध होणार आहे. न्यूझीलंडची टीम भारत दैऱ्यावर आहे. आधी वनडे आणि त्यानंतर टी-20 सीरिज होणार आहे. या सामन्यापुर्वी भारतीय संघासाठी एक दुखद बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर संघातुन बाहेर झाला आहे.

श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. पुढील मूल्यांकन आणि व्यवस्थापनासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (NCA) जाणार आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने श्रेयस अय्यरच्या जागी रजत पाटीदारची निवड केली आहे, अशी माहिती बीसीसीआईचे अध्यक्ष जय शहा यांनी दिली आहे.

भारतविरूद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी 2023 रोजी हैदराबादमध्ये खेळेला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वनडे सीरीज जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियासाठी ही सीरीज महत्त्वाची आहे.

न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा वनडे संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button