breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दर्शना पवार प्रकरणाला धक्कादायक वळण! डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा

पुणे : वेल्हे तालुक्यातील राजगड परिसरात एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहेत.

संबधित तरुणीच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर येतं आहे. त्यामुळे पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. १२ जूनला दर्शना आणि तिचा मित्र राहुल हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर आले होते. मात्र तिचा मित्र राहुल हा देखील गायब असल्याचे तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या पुत्रासह चौघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी तपासात सीसीटिव्ही बाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांचा मित्रावर संशय अधिक बळावला आहे. मात्र राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला असून दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेकिंग गेलेला मित्र घटनेनंतर फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. राहुल हाच मुख्य आरोपी आहे की आणखी त्या तरुणीला कुणी मारले याचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button