औरंगाबादच्या सभेसाठी शिवसैनिकाची तब्बल ६० किलोमीटरची अनवाणी पदयात्रा
![साहेबांसाठी कायपण! औरंगाबादच्या सभेसाठी शिवसैनिकाची ६० किलोमीटरची अनवाणी पदयात्रा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/साहेबांसाठी-कायपण-औरंगाबादच्या-सभेसाठी-शिवसैनिकाची-६०-किलोमीटरची-अनवाणी-पदयात्रा.jpg)
औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, आज सकाळीच एक शिवसैनिक तब्बल ६० ते ७० किलोमीटर पायी चालून सभास्थळी दाखल झाला आहे. विशेष म्हणजे पायात चप्पल न घालता त्याने हा प्रवास केला आहे.अंकुश पवार असे त्या शिवसैनिकाचे नाव असून ते जालना जिल्ह्यातील पांगरी येथून पायी चालत आले आहेत. आपण आतापर्यंत अनेक प्रकारचे नवस पाहिले असतील.
परंतु, या शिवसैनिकाने ६ कोटी ७५ लाख वेळी ‘राम नाम’ जप केले असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व जप आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी केले असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व जप आज मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं या शिवसैनिकाने सांगितले.
गेल्या ९ वर्षांपासून हा जप करत असल्याचे शिवसैनिकाने सांगितले. गेले दोन वर्ष करोना असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेता आली नाही. परंतु आता या सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटून हे ‘राम नाम’ जप आपण त्यांना देणार असल्याचे या शिवसैनिकाने सांगितले. तसेच, उद्धव ठाकरे हे आयुष्यभर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री रहावे असेही या शिवसैनिकांची ईच्छा असल्याचे त्याने सांगितले.