ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

वैद्यकीय विम्याचे दावे निकाली काढा!

वीज कर्मचाऱ्यांच्या बाबत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचे आदेश

पिंपरी : वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे प्रकरणे विमा कंपनीने ताबडतोब निकाली काढावेत, असे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. वीजक्षेत्रात सेवा देणाऱ्या महावितरणचे कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मानसिक तणाव येतो. त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना व अवलंबितांना वैद्यकीय उपचारासाठी विम्याचे कवच देण्यात आले आहे. त्याप्रमाणे हे आदेश निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले. पुणे परिमंडल अंतर्गत वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे दावे व इतर मुद्यांच्या तक्रार निवारणासाठी बैठक झाली. त्या वेळी राजेंद्र पवार बोलत होते.

या वेळी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ विभागीय अधिकारी सुनीता भुरेवार, मेडिक्‍लेम टीपीए मेडिअसिस्ट कंपनीचे महाव्यवस्थापक अमित गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर आदी उपस्थित होते.

विम्याचे प्रलंबित दावे आणि इतर तक्रारींच्या निराकरणाचा आढावा घेतला. दाव्यांच्या पडताळणीसाठी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रसंगी जादा कर्मचारी नेमून विम्याच्या दाव्यांची प्रकरण ताबडतोब निकाली काढावेत. तसेच कर्मचारी किंवा अवलंबित रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना आणि उपचार घेताना कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही याची पॉलिसीप्रमाणे विमा कंपनीने काळजी घ्यावी, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले. या वेळी उपस्थित विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी निराकरण करण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button