Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं पण… ; शहाजी बापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून काही आमदारांसह बंड केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली होती. यानंतर राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. यानंतर शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे दोन गट पडले.

दरम्यान या घटनेच्या तीन वर्षांनंतर आता शहाजी बापू पाटलांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांना गुवाहाटीला यायचे होते, परंतु आमदारांचा विरोध होता, असा दावा शहाजी बापू पाटलांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

हेही वाचा –  मी रामदास आठवले घराण्याचा…कवितांचा संदर्भ येताच फडणवीसांचं खास विधान

गुवाहाटी येथील बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांनी राऊत यांना विरोध केला. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे, लवकरच राजकीय घडामोडी घडतील असं शहाजी बापू पाटील म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button