‘संजय राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली आता..’; काँग्रेसमधील नेत्याचं विधान
![Sanjay Nirupam said that Sanjay Raut ended Shiv Sena, NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अंतर्गत वाद निर्माण झाल्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे संजय निरूपम संतापले आहेत. निरूपम यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका करून शिवसेना त्यांनीच संपवली असं म्हटलं आहे.
संजय निरूपम म्हणाले की, संजय राऊतांनी स्वत:ची शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली आणि आता ते आमची काँग्रेसही संपवत आहेत. त्याप्रमाणे मुंबईत जोर देऊन सहा पैकी पाच जागा घेण्याचा हट्ट आणि महाराष्ट्रातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागा घेण्याचा हट्ट त्यांनी केली. त्यांच्याकडे काही नाहीय. त्यांचे नेते पळाले, त्यांचे कार्यकर्ते पळाले. त्यांचे मतदार किती हेही माहित नाही. तरीही जबरदस्ती करून ते आमच्याकडून जागा घेत आहेत मी आज भाकित करून जाते की मुंबईमध्ये पाचव्या पाचही जागा शिवसेना गमावणार आहे.
हेही वाचा – जळगावमध्ये भाजपला ठाकरे गटाचा धक्का; खासदार उन्मेष पाटीलांचा आज ठाकरे गटात प्रवेश
मी आव्हान देतो की ते एकही जागा जिंकणार नाहीत. जेव्हा पाच जागा पडणार तेव्हा शिवसेना संपली आणि काँग्रेसही संपणार. कारण या पाच मतदारसंघातील कार्यकर्ता विखुरणार. वाटाघाटी बरोबरीचं झालं पाहिजे. आमचा प्रस्ताव होता की चीन तीन जागा घ्या. पण पाच जागा तुम्ही घेणार आणि एक आम्हाला देणार. मग आम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार? विदर्भात काँग्रेसची ताकद आहे, पण मुंबईत त्यांची ताकद नाही. ठाकरे गटाची सध्या काय ताकद आहे, हे कोणीही काही सांगू शकत नाही, असंही संजय निरूपम म्हणाले. ते माझा कट्ट्यावर बोलत होते.