राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना पगार रखडला
![Salary of 98,000 ST employees across the state was stagnant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ST-Bus.jpg)
मुंबई – कोरोनामुळे लागलेले निर्बंधामुळे एसटी महामंडळाला वर्षभरापासून आर्थिक चिंता सतावत आहे. त्यामुळे त्यामुळे राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतिक्षाच करावी लागणार आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला होणारे वेतन ऑगस्ट महिन्याची १५ तारीख उलटूनही हाती आलेले नाही. वेतनासाठी एसटी महामंडळाने ६०० कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली असून, त्यावर अद्यााप निर्णय झालेला नाही.
मार्च २०२० पासून करोना व निर्बंधांमुळे एसटी सेवेपासून प्रवासी दुरावले. मार्च २०२० पासून ते आतापर्यंत ६ हजार ४०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. महामंडळाला प्रवासी उत्पन्नच मिळत नसल्याने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले. त्यामुळे राज्य सरकारकडून आर्थिक मदत घेऊनच वेतन देण्यात आले. २०२१ मधील जानेवारी ते जून महिन्यासाठीही मदत घेतल्याने वेतन प्रश्न काहीसा सुटला होता. परंतु ती मदत संपल्याने जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिन्यातील सात तारीख उलूटूनही होऊ शकलेले नाही.