ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई रुग्णालयात दाखल
![“बाहेर बघितलं की पाऊस आणि टीव्ही लावला की संजय राऊत”, हसन मुश्रीफ यांनी सांगितला सत्तास्थापनेवेळचा किस्सा!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/hasan-mushrif-on-cbi-raid-at-anil-deshmukh-house-in-mumbai.jpg)
कोल्हापूर – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. त्यांना ताप आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती भैय्या माने यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्याला त्याचदिवशी मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देताना सोमय्या यांच्यावर शंभर कोटीचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर जिल्हाभर सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जिल्ह्यातील पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह महाविकास आघाडीनेही सोमय्या यांच्या निषेधाचे पत्रक दिले आहे. हसन मुश्रीफ यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची ही भेट घेतली.
दरम्यान, राज्यभर खळबळ उडवून दिलेले भाजपा नेते किरीट सोमय्या सोमवारी (ता. २०) कोल्हापुरात येणार आहेत.त्यामुळे याठिकाणी ते कोणते आरोप प्रत्यारोप करतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.