पाटण तालुक्यातील जाळगेवाडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा उत्साहात
रांगोळी स्पर्धेत तरुण मुला-मुलींसह बालचमूंचाही विशेष सहभाग
![Patan, Taluka, Jalgewadi, on the occasion of Navratri festival, Rangoli, in the spirit of competition,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Rangoli-Spardha-780x470.jpg)
पाटण (चाफळ) : जाळगेवाडी ता. पाटण येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. ग्रामीण भागातील लोकांना या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येण्याचे तसेच त्यांच्या मनोरंजनाचे एक माध्यम म्हणजे विविध स्पर्धांचे आयोजन. मुख्य बाब म्हणजे, मोबाईच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धांचे या ठिकाणी आयोजन करण्यात येते. त्याचा एक भाग म्हणून रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी रेखाटणे म्हणजे त्या व्यक्तीच्या मनाच्या सौंदर्याचे प्रकटीकरण करणे होय. मनुष्याच्या मनाचे कार्य, संस्कारांची निर्मिती, स्वभाव, स्वभावदोषांची उत्पत्ती आणि प्रकटीकरण इतरांसमोर व्यक्त करणे हाच रांगोळी स्पर्धेचा मुख्य हेतू मोर ठेऊन यावर्षीच्या रांगोळी स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. यामध्ये तरुण मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यामध्ये छोट्या बालचमूंनीही सहभाग नोंदविला.
स्पर्धा यशस्वीततेसाठी यांचे योगदान…
रांगोळी स्पर्धेत दिव्या साळुंखे, ऐश्वर्या भाडूगले, ओमकार साळुंखे, सानिका सुतार, सानिका पवार आदी स्पर्धक सहभागी झाले होते.
यामध्ये ऐश्वर्या भाडूगले हिस प्रथम, ओमकार साळुंखे यास द्वितीय तर दिव्या साळुंखे हिस तृतीय क्रमांक मिळाला. सर्व विजेत्यांना जाळगेवाडीच्या सरपंच संगिता बाळाराम सुतार यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. श्रीमती पवार, श्रीमती पाटील मॅडम, सनी सुतार आदींनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
रांगोळीद्वारे विविध साक्षात्कार…
यावर्षी स्पर्धेमध्ये रांगोळीद्वारे भारताच्या चांद्रयान मोहिमेचे प्रतिबिंब दिसले. त्याचप्रमणे शहीद जवानांना रांगोळीच्या माध्यमातून वंदन करण्यात आले. आदिशक्तीचे शुभंकर रुपही पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी तरुण मंडळीचे तसेच दुर्गादेवी मित्र मंडळ जाळगेवाडीचे विशेष सहकार्य लाभले.