breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जाणार

पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्यादृष्टीने व जनतेमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रती अधिक जागरूकता निर्माण व्हावी यादृष्टिने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी दिली आहे.

समाज कल्याण विभागामार्फत यावर्षीही २६ जून रोजी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती पायथा आणि राजीव गांधी अ‍ॅकेडमी ऑफ ई- लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा पुणे येथून विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – खुशखबर! राज्यात तलाठी पदासाठी ४ हजार ६२५ जागांची मेगाभरती जाहीर

या कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय दिनाच्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहनही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button