पीएफआयवरील बंदीनंतर राज ठाकरेंकडून अमित शाहांचे आभार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Raj-Thakre-3.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयवरील बंदीनंतर राज्यातील विविध नेत्यांकडून केंद्र सरकारे स्वागत केले जात आहे.
देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयवरील बंदीनंतर राज्यातील विविध नेत्यांकडून केंद्र सरकारे स्वागत केले जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमत्री अमित शाहा यांते आभार मानले आहेत.
राज ठाकरे यांनी पीएफआयवर बंदी घातल्याप्रकरणी अमित शाहा यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. “PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन”, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली आहे. पीएफआयवरील बंदीनंतर राज्यातील विविध नेत्यांकडून केंद्र सरकारचे अभिनंदन केले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अमित शाहांचे आभार
पीएफआयवरील बंदीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. तसेच, पीएफआय वरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याशिवाय, मागील आठवड्यात पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद अश्या घोषणा देणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.