#RainUpdates: महाराष्ट्राला पावसाची चाहूल, वाचा कुठे पोहोचला मान्सून?
![Monsoon News 2022 : महाराष्ट्राला पावसाची वाट पाहावी लागणार, वाचा कुठे पोहोचला मान्सून?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Monsoon-News-2022-महाराष्ट्राला-पावसाची-वाट-पाहावी-लागणार-वाचा.jpg)
पुणे : देशात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातही बळीराजा पावसाची प्रतिक्षा करत आहे. पण मान्सूनला राज्यात येण्यासाठी विलंब होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळत होता. पण आता त्याने पुढे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सूनने बंगालच्या उपसागरात पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे. खरंतर, केरळात वेळेआधी दाखल झाल्यानंतर वेगाने गोव्याला पोहोचणारा पाऊस रखडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. यंदा सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधाची मान्सून देशात दाखल झाला होता. मात्र, अरबी समुद्रातून मान्सून वेळेत पुढे सरकला नसल्याने विलंब होत आहे.
अखेर, मंगळवारी (ता. ७) मॉन्सूनने बंगालच्या उपसागरावर पुढे चाल केली आहे. पद्दुच्चेरी, कराईकलसह तमिळनाडू, बंगालच्या उपसागरात मान्सूनने प्रगती केली आहे. दरम्यान, ईशान्य भारतातील राज्य, सक्कीम तसेच पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. खरंतर, मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे राज्यातही मान्सून लवकर येणार असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. पण साधारणत: ५ जूननंतरच मान्सून कोकणात दाख होतो. पण केरळ, कर्नाटकात पाऊस वेळे आधी दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण मान्सूनची प्रगती थांबल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. पण असं पाहायला गेलं तर मान्सूनला फार काही उशीर झाला नाही. अद्यापही आपण नियमित वेळेच्या जवळच आहोत. शिवाय राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरूच आहे.