ईडीची मोठी कारवाई! देशभरात ३९ ठिकाणी छापे; ४१७ कोटींची मालमत्ता जप्त
![Raids at 39 locations across the country; 417 crore property seized](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/ED-780x470.jpg)
मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईसह विविध राज्यांत ३९ ठिकाणी छापेमारी केली आहे. मेसर्स महादेव ऑनलाईन बुक बेटिंग ॲप संबिधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये सुमारे ४१७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
छत्तीसगडमधील रहिवासी असलेले रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ॲपचे प्रवर्तक असून या कारवाईमध्ये तब्बल ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा – ‘भाजपाची लाट नाही, त्युनामी येणार’; देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण
ED has conducted searches against the money laundering networks linked with Mahadev APP in cities like Kolkata, Bhopal, Mumbai etc and retrieved large amount of incriminating evidences and has frozen/seized proceeds of crime worth Rs 417 Crore. pic.twitter.com/GXHWCmKOuY
— ED (@dir_ed) September 15, 2023
या विवाह सोहळ्यात अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी सादरीकरण केले होते. त्यामुळे तेही याप्रकरणात ईडीच्या रडावर आले आहेत. याशिवाय भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचीही नावे तपासात उघड झाली आहेत.