Pune | जून महिना संपण्याआधीच ४१ टक्के पावसाची नोंद

पुणे | पुणे शहरात गेल्या तीन, चार दिवस जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने पुणे शहरातील जून महिन्याची सरासरीही ओलांडली आहे. तसेच वार्षिक सरासरीच्या जवळपास निम्मा पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांत पडलेल्या जोरदार पावसामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहराच्या वार्षिक सरासरीच्या ४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात या वर्षी आतापर्यंत सुमारे ३१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुणे शहरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरच पाण्याखाली गेले होते. शिवाजीनगर येथे ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. १९९१ नंतर प्रथमच एका दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदवला गेला. जूनच्या सरासरीच्या जवळपास ६४ टक्के पाऊस एकाच दिवसात पडला होता.
हेही वाचा – ‘..तर विधानसभेला सगळ्यांना पाडणार’; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
तीन दिवसांच्या पावसानंतर देखील खडकवासला धरण साखळी क्षेत्राच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात केवळ ४.२१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्राचा पाणीसाठा वाढवण्यासाठी १२० मिलिमीटर पावसाची गरज आहे.