TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्र
‘नक्षत्र दर्शन’, ‘कवडसे मनाचे’ या काव्यसंग्रहांचे प्रकाशन उत्साहात
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट संजय पंडित यांनी लिहिलेल्या ‘नक्षत्र दर्शन’ आणि ‘कवडसे मनाचे’ या दोन कवितासंग्रहांचे प्रकाशन ज्येष्ठ कवि व गझलकार रमण रणदिवे आणि सुप्रसिद्ध संवादिनीवादक डाॅ. अरविंद थत्ते यांच्या हस्ते झाले. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील गणेश ऑडिटोरियम मध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला.
या समारंभास तालयोगी पं. सुरेश तळवलकर, गायक पं. विजय कोपरकर, जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर, तबलागुरू पं. सुरेश सामंत,ऑर्गनवादक राजीव परांजपे, तबलावादक पांडुरंग मुखडे, ज्येष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे, संवादिनीवादक व संगीत-अभ्यासक डाॅ. चैतन्य कुंटे अशी संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत दिग्गज उपस्थित होते. श्रीपाद उंब्रेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.