Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींकडून लालू प्रसादांच्या प्रकृतीची विचारपूस

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. बड्या राजकीय नेत्यांनी लालू यांच्या प्रकृतीची त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लालू यादव यांच्या प्रकृतीची चौकशी केली. लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी फोन केला होता. पंतप्रधान मोदी यांनी लालू यादव यांच्या प्रकृतीविषयी तेजस्वी यादव यांच्याकडे विचारपूस केली. तेजस्वी यादव हे बिहारचे उप मुख्यमंत्री आहेत.

गेल्या काही दिवसांपासून लालू यादव हे किडनी आजाराने त्रस्त होते. किडनी ट्रान्सप्लांटचा सल्ला डाॅक्टरांनी त्यांना दिला होता. कुटुंबातील व्यक्तिच किडनी दान करु शकते, असा नियम आहे. लालू यादव यांना त्यांची मोठी मुलगी रोहिणी आचार्य हिने किडनी दिली. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची माहिती ट्विट करुन तेजस्वी यादव यांनी दिली. लालू यादव यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. बहिण रोहिणी व लालू यादव यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, असे ट्विट तेजस्वी यादव यांनी केले होते.

सिंगापूर येथील माऊंटन एलिझाबेथ रुग्णालयात लालू यादव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरु असताना त्याची माहिती लालू यादव यांची दुसरी मुलगी मीसा भारती यांनी ट्विट करुन दिली होती. किडनी ट्रान्सप्लांटची रोहिणी यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता लालू यादव यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु आहे, असे मीसा यांनी ट्विट केले होते. शस्त्रक्रियेवेळी लालू यादव यांचे कुटुंब रूग्णालयात उपस्थित होते.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात भाजप यशस्वी झाली. तशीच काहीशी परिस्थिती बिहारमध्ये निर्माण झाली होती. मात्र वेळीच नितिश कुमार यांनी सर्तक होत भाजपशी काडीमोड घेतली. बिहारमधील अन्य पक्षाच्या आमदारांना सोबत घेऊन नव्याने सत्ता स्थापन केली. भाजपचा डाव हाणून पाडला होता. या सत्ता बदलात तेजस्वी यादव यांना उप मुख्यमंत्री करण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button