breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नवीन घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त न झाल्याने राज्यात पंतप्रधान आवास योजना ठप्प

मुंबई : राज्यात नवीन घरकुलांचे उद्दिष्टच प्राप्त न झाल्याने पंतप्रधान आवास योजना ठप्प झाली आहे. तसेच २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत मराठवाड्यासाठी मंजूर १ लाख ४५ हजार ७२३ घरकुलांपैकी ५२ हजार ४९९ घरकुलांची कामे झालीच नाहीत.

या योजनेत लाभ मिळणाऱ्या व्यक्तीला पाच टप्प्यात दीड लाख रुपये दिले जातात. परंतु गेल्या दोन वर्षांचे उद्दिष्ट केंद्राकडून प्राप्त झालेले नाही. तसेच २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत मराठवाड्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी सुमारे ५२ हजार ४९९ कामे झालीच नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – ‘अपात्रतेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत’; कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं विधान 

केंद्राकडून २०२०-२१ साठी ४१ हजार ५६६ उद्दिष्ट देण्यात आले होते या पैकी ३३ हजार १७८ कामे पूर्ण झाली. तर ८ हजार ३८८ कामे अपूर्ण आहेत. तसेच २०२१-२२ साठी १ लाख ४ हजार १५७ उद्दिष्टांपैकी केवळ ६० हजार ४६ घरकुलांची कामे झाली. तर ४४ हजार १११ कामे प्रलंबित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button