breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज?

Police Recruitment 2024 | राज्यात काही महिन्यांपूर्वी १७ हजार पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा झाली होती. परंतु भरती प्रक्रिया जाहीर होत नव्हती. त्यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधुक वाढली होती. अखेर सरकारनं भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

ऑनलाईन पद्धतीनं या पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावं लागणार आहे. ३१ मार्च २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. यापूर्वी आपल्याला अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे. पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई आणि कारागृह कॉन्स्टेबल अशा पदांसाठी भरती होत आहे.

राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. उमेदवारांनो policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरतीसंदर्भातील अधिक माहिती घेऊ शकता. इच्छुक उमेदवार ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करू शकतात.

हेही वाचा     –      PM किसानचा १६ वा हप्ता मिळाला नाही? शेतकऱ्यांनी काय करावं? 

या पदांसाठी भरती

पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती प्रकिया होणार आहे.

अर्जासाठी शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये शुल्क आहेत , तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.

पात्रता आणि वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे.

भरती प्रक्रिया कशी असेल?

भरती प्रक्रियेमध्ये आधी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button