पिंपरी-चिंचवडमध्ये वाढदिवसानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्वच्छता अभियान
स्तुत्य उपक्रम: रुग्णवाहिका वाहनचालक मारुती जाधव यांची सामाजिक बांधिलकी
![Pimpri-Chinchwad, Birthday, Mahapurush, Statue Cleaning Mission,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/PCMC-clean-Birthday-780x470.png)
पिंपरीः वाढदिवस म्हटला म्हणजे घरात आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक जण आपल्या प्रियजनाचा वाढदिवस अतिशय उत्साहात आनंदात व विविध अशा मेजवानीने साजरा करत असतात. इतकेच काय तर वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं ते जोरदार सेलेब्रेशन, केक कापून एकमेकांच्या तोंडावर फासणे, डिजे लावून पार्टी वैगरे, धांगडधिंगा घालणे, असे बरेचदा आपल्या सभोवती वाढदिवस होतांना पहायला मिळते. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत पिंपरी-चिंचवड शहरातील महापुरषांच्या पुतळ्यांची साफसफाई, स्वच्छता तसेच डागडुजी करत आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच वायसीएम विभागातील रुग्णवाहिका वाहनचालक मारुती जाधव अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत, पिंपरी-चिंचवड शहरांमधील सर्व थोर मोठे महापुरुष यांचे स्वच्छता अभियान आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती जाधव यांनी शहरवासियांना एक अनोखा आदर्श घालून देत सामाजिक संदेश दिला आहे. जाधव यांच्या या अभियानाची शहरभर चर्चा तसेच कौतुक होत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Untitled-2-1024x488.jpg)
स्वच्छता अभियानामध्ये सर्व मित्र परिवार कार्यकर्ते यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. सदर स्वच्छता अभियान पूर्ण करण्यासाठी विशाल गरड, अक्षय ओहोळ, सेफ खान सागर म्हस्के कुणाल पळसकर असलम यांनी विशेष सहभाग घेतला.